अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन


अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन

 





त्र्यंबकेश्वर : सप्तशृंगी देवीच्या चरणी लिन झाल्यानंतर सुप्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळच्या वेळी भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पती राज कुंद्रा तसेच काही आप्तस्वकीय होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचे येथे आगमन झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम यांनी त्यांचे स्वागत केले. भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले. दर्शन पार पडल्यावर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. तत्पुर्वी विश्वस्त प्रशांत गायधनी व संतोष कदम यांनी त्यांना मंदिराचे महात्म्य सांगितले तर पुरोहित वेदमुर्ती रतीश तथा बापु दशपुत्रे यांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या त्रिकाळ पुजेची माहिती दिली.

देवस्थानच्या वतीने सत्कार
देवस्थानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व भगवान त्र्यंबकेश्वराची प्रतिमा देउन सत्कार करण्यात आला. भगवान भोलेनाथाच्या दरबारात येउन प्रसन्नता लाभल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली. यावेळी फोटो काढण्यासाठी नागरीकांमध्ये चढाओढ लागली होती. यावेळी देवस्थानचे अधिकारी अमित टोकेकर, जाधव, विजय गंगापुत्र, ऊदय पाटील आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयातून बाहेर पडताच सेलिब्रेटी पाहण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !