सुरतमध्ये गॅस गळतीने सहा जणांचा मृत्यू : 25 जणांची प्रकृती चिंताजनक


सुरत : टँकरमधून गॅस गळती झाल्याने सहा कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला असून 25 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सुरतमध्ये गुरुवारी सकाळी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये सचिन परीसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ एक टँकर चालक विषारी रसायनं टाकत असतानाच विषारी वायूची गळती सुरु झाली त्यामुळे जवळच असलेल्या गिरणीच्या कर्मचार्‍यांनाही लागण झाली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन

गुदमरल्यामुळे चौघा जणांचा मृत्यू
सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परीसरात घबराट पसरली होती. प्राथमिक माहितीनुसार, गुदमरल्यामुळे चौघा जणांना प्राण गमवावे लागले.





गुजरातमध्ये वायू गळतीची पुनरावृत्ती
याआधी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात रासायनिक टाकी साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या ढोलका येथील चिरीपाल ग्रुपच्या विशाल फॅब्रिक युनिटमध्ये हा अपघात झाला. या अपघातात गॅस गळती कुठून झाली, हे समजू शकले नव्हते.

भीषण अपघातात तिघे प्राथमिक शिक्षक ठार ; तिघांची प्रकृती चिंताजनक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !