महिलेच्या डोक्यावर थुंकल्याने प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब वादाच्या भोवर्‍यात ; जाणून घ्या नेमके काय घडले


नवी दिल्ली : ब्युटी पार्लर चालक महिलेचे केस कापताना प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (Javed Habib) यांनी चक्क डोक्यात थुंकल्याचा प्रकार समोर आला असून त्याबाबतचे व्हिडिओदेखील सोशल मिडीयावर आता जोरदार व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे महिलावर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे राहणार्‍या ब्युटी पार्लर ऑपरेटरने भारतातील टॉप हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (Javed Habib) यांच्यावर डोक्यावर थुंकल्याचा आरोप केला आहे.





सोशल मिडीयावर तो व्हिडिओ जोरदार व्हायरल
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा (Javed Habib) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिलेच्या डोक्यावर थुंकताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जावेद हबीब (Javed Habib) या थुंकीत जीव आहे असे म्हणताना ऐकू येत आहे. जावेद हबीबने (Javed Habib) थुंकून केस कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या थुंकीत जीव आहे, असे जावेद हबीब म्हणाले, तेव्हा उपस्थित सर्व लोक हसू लागले. पीडित महिलेने या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करत आपला त्रास कथन केला आहे.

महिला म्हणाली ; गल्लीत केस कापेल मात्र जावेदकडे नाही
जावेद हबीबवर (Javed Habib) आरोप करणार्‍या महिलेचे नाव पूजा गुप्ता (Pooja Gupta) आहे. त्या व्हिडिओमध्ये स्वत:ला बरौत येथील रहिवासी असल्याचे सांगत असून आपले वंशिका ब्युटी पार्लर असून जावेद हबीब (Javed Habib) यांंच्या सेमिनारला गेले असता त्यांनी मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले आणि त्यांनी गैरवर्तन केले. तुमच्याकडे पाणी नसेल तर थुंकीने केसही कापता येतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे मी माझे केस कापले नाहीत. मी माझे केस कोणत्याही गल्लीच्या, कोनाड्याच्या नाई कडून कापून घेईन, पण जावेद हबीबला केस कापू देणार नाही, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करणार
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब (Javed Habib) यांच्या व्हिडीओवर सलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने तीव्र आक्षेप घेतला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीद म्हणतात की हबीबला संपूर्ण नाई समाजाची माफी मागावी लागेल. येत्या काही दिवसांत हबीबने माफी मागितली नाही, तर त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल आणि मोर्चाही काढला जाईल, असे काशीद सांगतात. दरम्यान, हा व्हिडिओ 3 जानेवारीचा असून हा सेमिनार मुझफ्फरनगरमध्ये आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !