पंजाब पोलिसांकडून शॉर्प शुटरसह तिघे जाळ्यात


चंडीगढ : पंजाब सरकारवर पंतप्रधानांच्या ताफा आंदोलकांनी रोखल्याच्या प्रकारानंतर टिकेची झोड उठली असतानाच गृहमंत्रालयाने संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातच पंजाब पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब पोलिसांनी कॅनडात असलेल्या कुख्यात गँगस्टर अर्षदीप सिंह ऊर्फ अर्श डालाच्या शार्प शुटर गुरप्रीत गोगीसह तीन गुडांना अटक केली आहे. या तिघांकडून दोन 9 एम.एम. पिस्तुल, दोन हँड ग्रेनेड आणि 18 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये, गोगी हा तरनतारणच्या प्रदेशातील भिखीविंड घटनेत गतवर्षी अटक करण्यात आलेल्या टिफन बॉम्ब प्रकरणातही नावजलेला होता. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धार्मिक स्थळांवर कारवायांसाठी आरोपींचे प्रयत्न
एसएसपी चरणजीत सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, विदेशातून शस्त्रास्त्रे पुरवली असतील, असा अंदाज आहे. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत गडबड करण्याचा कट रचण्यात आल्याबाबतचे वृत्त सिंग यांनी फेटाळून लावले आहे. मात्र, या तिघांना पंजाबमध्ये धार्मिक स्थळांवर स्फोट घडवून दहशत पसरविण्यासाठी तयार करण्यात येत होते, असे सिंग यांनी म्हटले आहे. त्यातून, काही जणांच्या माध्यमातून शस्त्रांस्त्रांची खेप यांच्याकडे पोहोचल्याचंही सिंग यांनी सांगितलं.





पोलिसांवर हल्ला करताना आरोपी जाळ्यात
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मेहना पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, स्फोटकं आणि शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तिघांची कार नाकाबंदीच्या ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी धाडसी कारवाई करत या तिघांनाही जेरबंद केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !