माजी मंत्री गिरीश महाजनांना कोरोनाची लागण
जामनेर : माजी जलसंपदा मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील बड्या मंत्र्यांसह आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्यांनी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे.
शनिवारी चाचणी आली पॉझीटीव्ह
आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) हे गेल्या दोन दिवसांपासून विविध विकासकामांच्या बाबत मतदारसंघात दौरे करत आहेत. तसेच शनिवार, 8 जानेवारी रोजी त्यांच्याहस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. याबाबत तयारी देखील करण्यात आलेली होती. मात्र शनिवारी सकाळी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझीटीव्ह (Positive) आल्यामुळे महाजन यांनी तातडीने स्वतःला कॉरंटाईन केले आहे.




टीप्सही जाणल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्याशी चर्चा करून कोरोना महामारीच्या आजारातून बरे होण्यासाठी महाजन (MLA Girish Mahajan) यांनी विविध टिप्स जाणून घेतल्याचे समजते.