पाच राज्यांमध्ये निवडणूक : निवडणूक आयोग आज करणार घोषणा
मुंबई : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, उत्तरप्रदेशात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून (Election Commission Press Conference on Assembly Election ) शनिवार, 8 रोजी दुपारी 3.30 वाजता घोषणा होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग पत्रकार परीषद घेवून माहिती देणार आहे. कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती.
बेरोजगारांना मोठी संधी : रेल्वेत तब्बल एक लाख २४ हजार जागांसाठी भरती
मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो. कोविड प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले तरच या छोट्या रॅली काढता येतील. दोन्ही डोस लागू केलेल्या लोकांना मेळाव्यात घेण्याचे आवाहन पक्षांना करता येईल. त्या शिवाय, निवडणूक-मतदानाच्या कामात सहभागी होणार्या कर्मचार्यांच्या आरोग्याची चिंता निवडणूक आयोगाला आहे.




नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर होणार
निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच निवडणूक आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करू शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. एकदा जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे अंतिम असतील असे होणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची परीस्थिती पाहता त्यांचे फेरबदल सुरूच राहणार आहेत.
या दिवशी संपेल पाच राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ
गोवा राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी, उत्तराखंडचा कार्यकाळ 23 मार्च रोजी, पंजाब राज्याचा कार्यकाळ 27 मार्च रोजी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपत आहे.