पाच राज्यातील निवडणुकांचा बिगुल वाजला : जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम
नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून निवडणुका जाहीर झालेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी शनिवारी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण सात टप्प्यात ह्या निवडणुका होतील.
10 मार्च रोजी होणार मतमोजणी
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही 10 मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम हा पुढीलप्रमाणे आहे.




आचारसंहिता झाली लागू
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची शनिवारी घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पाच राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण 403 आमदार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 7 मार्च रोजी होणार आहे तर मतमोजणी ही 10 मार्च रोजी होईल.
तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान
पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे तर उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 व 7 मार्च अशा एकूण सात टप्प्यात मतदान होईल.
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत मतदान
पहिला टप्पा : 10 फेब्रुवारी 2022
दुसरा टप्पा : 14 फेब्रुवारी 2022
तिसरा टप्पा : 20 फेब्रुवारी 2022
चौथा टप्पा : 23 फेब्रुवारी 2022
पाचवा टप्पा : 27 फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा : 3 मार्च 2022
सातवा टप्पा : 7 मार्च 2022
मतमोजणी : 10 मार्च 2022
पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान
मतदानाची तारीख : 14 फेब्रुवारी 2022
मतमोजणी : 10 मार्च 2022
गोव्यात एकाच टप्प्यात
मतदानाची तारीख : 14 फेब्रुवारी 2022
मतमोजणी : 10 मार्च 2022
उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात मतदान
मतदानाची तारीख : 14 फेब्रुवारी 2022
मतमोजणी : 10 मार्च 2022
मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान
पहिला टप्पा : 27 फेब्रुवारी
दुसरा टप्पा : 3 मार्च
मतमोजणी :10 मार्च 2022