खडसेंवर ठाण्यात उपचाराची गरज : माजी मंत्री गिरीश महाजन


जामनेर : मोक्काच्या धाकाने माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोना तर झाला नाही ना ! अशी टीका माजी मंत्री खडसे यांनी शनिवारी करून खळबळ उडवून दिली होती या टीकेला माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील तेवढेच जोराने प्रत्युत्तर दिले आहे. खडसे यांच्यावर ‘ठाण्या’च्या उपचाराची गरज आहे”, असे माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.

चाचणी खोटी हे सिद्ध करून दाखवा
राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी, असे खुले चॅलेंजदेखील त्यांनी केले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर मोक्काच्या धाकाने त्यांना कोरोना झाला असावा? असा संशय व्यक्त केल्याने महाजन यांनी खडसेंच्या प्रतिक्रीयेचा समाचार घेतला आहे. या संदर्भात गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे स्वत: ईडीच्या उंबरठ्यावर आहे, सात महिन्यापासून जावई जेलमध्ये आहे. आता कोण आत जाते आणि कोण बाहेर जाते हे काळच ठरविणार आहे. मला कोरोना झाला याचे खडसेंनी फार बाऊ करून घेण्याची गरज नाही. माझ्यावर मोक्का लावण्यासाठी व खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांवर दबाव काय आणता हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे. स्वत: खडसे ईडीच्या घेर्‍यात आहे त्यांनी मला शिकविण्याची आता गरज राहिली नाही. त्यांना खरोखर आता ठाण्यात उपचार घेण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.





शंका असल्यास तक्रार करावी
आमदार महाजन म्हणाले की, राज्यात एकनाथराव खडसे यांच्या पक्षाची सत्ता आहे. मी माझ्या कोरोनाची चाचणी याच सरकारच्या लॅबमधून केलेली आहे. यात त्यांना काही शंका असेल तर त्यांनी आपल्याच सरकारच्या लॅबमधील रिपोर्टबाबत तक्रार करावी, अथवा याच्या सत्यतेची चौकशी करावी असा सल्ला देखील गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !