गिरीशभाऊंना पुण्यातील बुधवार पेठेत पाठवावे लागेल ; माजी मंत्री खडसेंच्या टिकेने खळबळ
जळगाव : माजी मंत्री खडसे व माजी मंत्री महाजन यांच्यात कोरोना झाल्यानंतर आरोपाच्या फैरी झडत असतानाच माजी मंत्री खडसेंनी महाजनांना झालेला कोरोना (Corona) मोक्कान्वये कारवाई सुरू असताना तर झाला नाही ना? असा प्रश्न केल्यानंतर महाजनांनी खडसेंनी ठाण्यात उपचारार्थ पाठवण्याची गरज असल्याचे म्हटले होते मात्र या टोल्याला उत्तर देताना खडसे यांनी मल ठाण्याची गरज नसून गिरीश महाजनांना बुधवारपेठेत पाठवण्याची गरज असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
नेत्यांमधील कलगीतुर्याने मनोरंजन मात्र जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष
दोन्ही नेते एकमेकांवर निशाणा साधत असलेतरी त्यातून मनोरंजनाशिवाय काही काहीही पडत नाही मात्र दुसरीकडे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत आहे हे देखील तितकेच खरे. कोरोना (Corona) झाल्यानंतर ‘नाथाभाऊंना (Nathbhau) ठाण्याला पाठवावे लागेल’ असे वक्तव्य शनिवारी आमदार महाजन (MLA Girish Mahajan) यांनी केले होते व खडसेंनी (Khadse) या वक्तव्याचा समाचार घेताना मला ठाण्याला जाण्याची गरज नाही परंतु गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल, असे खळबळजनक वक्तव्य केल्याने जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.




टिकेचा स्तर घसरला
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे (NCP Leader Eknathrav Khadse) आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्यातील वैर सर्वानाच ठाऊक आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोन्ही नेते सोडत नाही. काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांना दुसर्यांदा कोरोना झाला असता आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी, ‘ईडीच्या तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो’ अशी टीका केली होती. शनिवारी आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan)यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर एकनाथराव खडसेंनी (Eknathrav Khadse) त्यावर प्रतिक्रिया देताना, मला तर खरोखर कोरोना झाला होता परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते त्यामुळेच गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांना कोरोना झाला असावा ? असा मला संशय असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले होते.
नाथाभाऊंवर ठाण्यात उपचाराची गरज
खडसेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘नाथाभाऊंना ठाण्याच्या उपचाराची गरज आहे. राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिद्ध करावे, असे खुले आव्हान आमदार महाजन यांनी दिले होते. महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत खडसेंनी जहरी टीका केली असून ‘नाथाभाऊला ठाण्याला पाठविण्याची गरज नसून गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे ते म्हणाले. तसेच जळगावात मोक्का कारवाईच्या संदर्भात पोलिसांचे पथक आले असून काल मी याबाबत बोललो होतो हा निव्वळ योगायोग आहे असेही खडसे (Khadse) म्हणाले.