कौटुंबिक वादातून पत्नीची हॉटेलमध्ये हत्या … या शहरातील घटना


नवी दिल्ली : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली. गाझियाबादमधील खोडा येथील आदर्श नगर येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी महिलेचा खून झाला होता मात्र हा खून पतीनेच केल्याचा आरोप मयताच्या कुटुंबियांनी केला आहे.

तीक्ष्ण हत्याराने केली महिलेची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बुराडी येथील रहिवासी असलेल्या प्रियंका (27) हिची हॉटेल एएलएक्सच्या रूम नंबर-107 च्या बाथरूममध्ये भोसकून हत्या करण्यात आली. प्रियांकाची बहीण चंचल सांगते की, प्रियांकाचे लग्न अडीच वर्षांपूर्वी हापूडच्या गढीत राहणार्‍या अर्जुनसोबत झाले होते. तेव्हापासून सासरचे लोक प्रियांकाला हुंड्याची मागणी करत मारहाण करत होते. गेल्या सहा महिन्यांपासून प्रियंका तिच्या बहिणीसोबत बुराडी येथे राहत होती. अर्जुनने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रियांकाला फोन करून खोडा कॉलनीतील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. पती अर्जुनने प्रियांकाची बाथरूममध्ये वार करून हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच खोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. खोडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !