संतापजनक ! शारीरीक सुखासाठी बायकांची अदला-बदली : रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात
केरळ : एका महिलेच्या तक्रारीनंतर बायकांची अदला-बदली करणारे रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. या प्रकरणी सात संशयीतांना केरळमधील कोट्टायम येथून अटक करण्यात आली तर 25 हून अधिक लोक पोलिसांच्या निगराणीखाली आहेत. संशयीतांनी पत्नी बदलण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरवर ग्रुप तयार केले व या ग्रुपमध्ये एक हजार लोकांचा समावेश होता. याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर या रॅकेटचा भांडाफोड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.




शारीरीक संबंधासाठी बायकांची अदला-बदल
दुसर्या महिलेशी शारीरीक संबंध बनवण्यासाठी रॅकेटच्या माध्यमातून बायकांची अदला-बदल केली जात होती शिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून बिनबोभाट पद्धत्तीने हा प्रकार सुरू होता. आधी ते टेलीग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील व्हायचे आणि नंतर एकमेकांना भेटायचे. एका महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा प्रकार उघड झाला तर चांगनचेरीचे डेप्युटी एसपी आर.श्रीकुमार यांनी सांगितले की आम्ही तक्रारदाराच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही तपास करत आहोत.
उच्चभ्रू वर्गातील लोकांचा रॅकेटमध्ये सहभाग
अटक करण्यात आलेले लोक केरळमधील अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम (अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम) येथील रहिवासी आहेत. राज्यातील अनेक उच्चभ्रू वर्गातील लोक या रॅकेटचा भाग असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. या रॅकेट प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे तर 25 हून अधिक लोक पोलिसांच्या निगराणीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे व्हॉट्सअॅप ग्रुप आणि मेसेंजर ग्रुपमध्ये एक हजाराहून अधिक सदस्य असल्याचा संशय आहे.