फेसबुक लाईव्ह करीत एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या


कोलकाता : फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करीत एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या (Suside) केली. पश्चिम बंगालमध्ये ही धक्कादायक घटना घडली. कुटुंबाला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर परगाना जिल्ह्यातील बकखाली परिसरात खळबळ उडाली. मृतकांमध्ये अशोक नस्कर, त्यांची पत्नी रीता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर यांचा समावेश आहे.

रक्कम हडपल्याचा आरोप
कुटुंबाने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह (Facebook Live) सुरूच ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना आढळले की, मृतकांमध्ये अशोक नस्कर, त्यांची पत्नी रीता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर यांचा समावेश आहे. अशोक आणि रीता यांची मुलगी पूनम एका संस्थेशी जोडलेली आहे. तिच्यावर संस्थेचे 14 लाख (14 Lakh) रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला. 8 जानेवारीला सकाळी संस्थेच्या काही महिला नस्कर कुटुंबाच्या घरी पोहचल्या. महिलेने पूनम आणि तिच्या घरच्यांना अपमानीत केले.





झाडाला बांधून मारहाणीचा आरोप
स्थानिकांच्या माहितीनुसार, स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला घेऊन गेले. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही घराबाहेर काढत घराला कुलूप लावलं. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम आणि तिच्या पतीला रस्सी बांधून संपूर्ण गावात फिरवले गेले. तसेच एका झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.

अपमानामुळे कुटुंबाने मृत्यूला कवटाळले
प्राथमिक चौकशीत कळालं की, याच अपमानामुळे अशोक, रिता आणि अभिषेक या तिघांनी एका जंगलात जात आत्महत्या केली. सध्या पूनमला पोलिसांनी रेस्क्यू केले आहे. जेव्हा या घटनेचा फेसबुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला तेव्हा पोलिसांना याची माहिती कळाली. पोलिसांनी या प्रकरणात स्वनिर्भर संस्थेच्या 5 महिलांना ताब्यात घेतले असून आणखी काहींची चौकशी करण्यात येत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !