हत्येचे सहा गुन्हे दाखल असलेला जहाल नक्षलवादी जाळ्यात


गडचिरोली : हत्येचे सहा गुन्हे दाखल असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गडचिरोलीत पोलिस दल आणि सीआरपीएफनं (Gadchiroli Police and CRPF) केलेल्या कारवाईत बेड्या ठोकल्या आहेत. करण ऊर्फ दुलसा नरोटे असे अटकेतील जहाल नक्षलीचे नाव आहे. शासनाने त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आले. करण ऊर्फ दुलसा पेका नरोटेवर हत्येचे 6, चकमक 4, दरोडा 2, जाळपोळ 3, अपहरण 1 असे तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे अटक
गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांभिया) जंगल परीसरात विशेष अभियान पथक व सीआरपीएफ बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात आली. नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे (वय 30) हा प्लाटून क्रमांक 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !