पतीचे विवाहबाह्य संबंध ; पत्नीने केली आत्महत्या


नवी दिल्ली : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कळाल्यानंतर व्यथीत झालेल्या पत्नीने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली. अनुराधा (31) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
विवाहिता अजमेरमध्ये राहत होती. तिला दोन वर्षांची एक मुलगी आहे. महिलेने सुसाईड नोटमध्ये बाबा माझ्यामुळे तुम्हाला आता कोणासमोरही झुकावं लागणार नाही. यासाठी मी स्वत:ला संपवत आहे. माझ्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं, म्हणून हिची काळजी घ्या असं म्हटलं आहे. तीन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिची पती जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पतीवर विवाहबाह्य संबंधासह सासरच्या मंडळींकडून शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.





गळफास घेत आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या वैशाली नगरमधील शिव सागर कॉलनीत राहणारे मधुसूदन सोमानी यांची मुलगी अनुराधा (31) हिने शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी घरात आई-वडील आणि भाऊ नव्हते. केवळ दोन वर्षांची मुलगी अनन्या होती. कुटुंबातील सदस्य घरी पोहोचले तेव्हा ती लटकलेल्या अवस्थेत दिसली. यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. शनिवारी रात्री अनुराधा आपल्या दोन वर्षांची मुलगी अनन्यासह घरात एकटी होती.

सासरची मंडळींवर गंभीर आरोप
अनुराधाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अनिरूद्ध तिला सासरी सोडून जर्मनीला निघून गेला होता. दोघे तीन वर्षात केवळ 6 महिने एकत्र राहिले. सासरी तिचे सासू-सासरे आणि दिर शारीरीक आणि मानसिक त्रास देत होते. तिला जेवायला देखील देत नसत. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून अनुराधा माहेरी निघून आली होती. पण ती नेहमीच तणावात असायची. यातूनच तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !