पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उडाली धांदल : अचानक टेलीप्रॉम्टर पडले बंद
दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात भाषण करताना अचानक टेलीप्रॉम्टर (Teleprompter) बंद पडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची काहीशी धांदल उडाली. संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपल्या वक्तृत्व शैलीने प्रसिद्ध आहे. त्यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूर संवादाद्वारे विशेष भाषण दिले मात्र या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. कारण, भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये (Teleprompter) तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे थोड्या वेळासाठी पंतप्रधान मोदी गोंधळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत असल्यामुळे सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
अचानक बंद पडले टेलिप्रॉम्टर
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भाषणामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. या व्हिडिओमध्ये ते सांगत होते की, भारतीयांनी कोरोनाविरुद्ध कसा लढा दिला, यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असेही त्यांनी सांगितले मात्र पुढे बोलत असताना टेलिप्रॉम्टरमध्ये (Teleprompter) तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि तो बंद झाला. त्यानंतर पंतप्रधान बोलायचे थांबले. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) गोंधळ उडाल्यामुळे ते संतप्त हावभाव त्यांच्या चेहर्यावर दिसून आले. ते उजवीकडे पाहू लागले. नंतर ते निराश झाले आणि हात वर करून शेवटी त्यांनी हेडफोन लावत त्यांनी आपल्या भाषणाध्ये झालेल्या गोंधळावर समोरील व्यक्तींना विचारु लागले की, तुम्हाला ऐकू येतंय का?




सोशल मिडीयावर होतेय टिका
संपूर्ण जगात आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रसिद्ध आहेत. पण, यावेळी टेलिप्रॉम्टरमध्ये (Teleprompter) ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा चांगलाच गोंधळ उडालेला दिसला. त्यांना अडखळत अडखळत बोलू लागले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे.
इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2022
राहुल गांधी म्हणाले ; टेलिप्रॉम्पटर सुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, ’टेलिप्रॉम्पटर (Teleprompter) सुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही.’ दुसरीकडे, काँग्रेसच्या (Congress) अधिकृत ट्विटर हँडलवरून ’हमे तो टेलिप्रॉम्पटरने (Teleprompter) लूटा, अपनो में कहा दम था’, असे म्हणत नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधण्यात आला.
हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।#TeleprompterPM
— Congress (@INCIndia) January 17, 2022