धक्कादायक : बोकडाचा बळी देताना माणसाचाच कापला गळा


चित्तूर : नशेत असलेल्या इसमाने बोकडाचा बळी देताना बोकड धरलेल्या माणसाचा गळा कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्तूरमधल्या वलसापल्लेमध्ये संक्रांतीनिमित्त यल्लमा मंदिरात बळी दिला जातो. आरोपी चलापथी जनावरांचा बळी देत होता. त्यावेळी 35 वर्षांचा सुरेश बकर्‍याला धरून उभा असतानाच चलापथीनं बकर्‍याऐवजी सुरेशची मान कापली व त्यात त्याचा मृत्यू झाला.

नशेत घडले कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चलापथी नशेच्या अमलाखाली असताना ही घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुरेशला मदनपल्ले येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. चलापथीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. सुरेश विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. चलापथी आणि सुरेशचा काही जुना वाद होता का ? याचा तपास पोलिस करत आहेत






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !