पत्नीसह दोन मुलांची हत्या करीत स्वतःही केली आत्महत्या : कारण ऐकून धक्का बसेल !


नागपूर : पत्नीसह दोन मुलांची निर्घृण हत्या करून स्वतःला देखील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उपराजधीत घडल्याने खळबळ उडाली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दयानंद पार्कजवळ मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत मदन अग्रवाल (40) यांच्यासह किरण (34), मुलगा वृषभ (वय 10) आणि मुलगी टिया (5) यांचा मृत्यू झाला. क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे डोक्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने मदन अग्रवाल यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

क्रिकेट सट्ट्याने केला घात
मयत मदनला क्रिकेट सट्ट्याचा नाद लागल्याने होते नव्हते ते सर्व गमावले तसेच स्वतःचे राहते घरही बँकेत गहाण ठेवले. कर्ज थकीत झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी बँकेने मदनचे घर जप्त केले त्यामुळे तो परीवारासह दयानंद पार्क जवळ भाड्याच्या खोलीत राहायला आला. सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत तो आजूबाजूच्यांना दिसला. मंगळवारी दुपार झाली तरी त्याच्या घराचे दार बंदच होते. वारंवार फोन करूनही तो प्रतिसाद देत नसल्याने त्याच्याकडे आलेल्या त्याचा एक मित्र कंपाउंड वॉल चढून आत गेला. दार बंद दिसल्याचे त्याने खिडकीतून डोकावले असता मदन समोरच्या खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे मित्राने घर मालकाला ही माहिती दिली. घरमालकांनी शेजारी तसेच जरीपटका पोलिसांना कळविले.





आधी मुलांची केली आत्महत्या नंतर स्वतःलाही संपवले
चिमुकली टिया व वृषभच्या पोटावर चाकूचे घाव मारण्यात आले तर पत्नी किरणची गळा चिरून हत्या करण्यात आली. परीमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, अतिरीक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी घटनास्थळी पोहोचले.

कर्जाच्या तगाद्याने आत्महत्येचा संशय
सूत्रांच्या माहितीनुसार, मदन अग्रवाल याच्यावर क्रिकेट बुकींचे 30 ते 40 लाखांचे कर्ज होते. संबंधित बुकी कर्ज वसुलीसाठी त्याच्यामागे तगादा लावत होते. त्याला कंटाळूनच मदनने आपल्या निर्दोष पत्नी आणि मुलांची निर्घुण हत्या करून स्वतःला संपविले असावे, असा संशय आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !