पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्या नातेवाईकांडे ईडीची धाड : सहा कोटींची माया जप्त
चंदीगड : पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत ईडीने भूपेंदरसिंह हनी आणि भूपेंदर यांच्या जवळचे संदीप कपूर यांच्या घरामधून अनुक्रमे 6 आणि 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईत ईडीने संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रेदेखील जप्त केल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून केली टिका
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी (Charanjit Singh Channi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या होता. अशाच प्रकारे काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दबाव तंत्राचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी दिली आहे. तर राहुल गांधी यांनी देखील आपल्या ट्विटर (tweet) अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.




ईडी हे भाजपाचे सर्वात आवडते शस्त्र
ईडीकून (ED) धाड टाकणे हे भाजपाचे (BJP) सर्वात आवडते शस्त्र आहे. भाजपा अनेक गोष्टींना लपवू पाहत आहे. आम्हाला कशाचीही भीती नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून ईडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. अवैध पद्धतीने रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करणार्यांना ईडीने लक्ष्य केलं आहे.
ईडीच्या छापेमारीने खळबळ
मंगळवारी ईडीने (ED) अनेक लोकांच्या घरावर छापेमारी केली. यामध्ये चन्नी यांच्या नातेवाईकांचादेखील समावेश आहे. ईडीच्या अधिकार्यांनी चंदीगड, मोहाली, पठाणकोट, लुधियाना अशा महत्त्वाच्या ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. या कारवाईत ईडीसोबत सीआरपीएफचे जवानदेखील होते. 2018 साली नवाशहर पोलिसात (nawashaher police) एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल पोलिसांनी घेतलेली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.