जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट : भुसावळात पुन्हा रुग्णसंख्या शतकापार तर जिल्ह्यात आढळले तब्बल 469 बाधीत
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना (Jalgaon Corona) सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ (Bhusawal Corona) रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात बुधवार, 19 जानेवारी रोजी एकाच दिवसात तब्बल 469 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भुसावळसह जळगावात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
आतापर्यंत 2580 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 580 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Jalgaon Corona Death) झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 46 हजार 254 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 806 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. बुधवारी 79 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 126
जळगाव ग्रामीण 22
भुसावळ 118
अमळनेर 37
चोपडा 55
पाचोरा 13
भडगाव 00
धरणगाव 05
यावल 06
एरंडोल 40
जामनेर 08
रावेर 01
पारोळा 00
चाळीसगाव 37
मुक्ताईनगर 04
बोदवड 00
अन्य जिल्हा 01
भुसावळातील कोरोनावाढीचे हे समोर आले कारण
रेल्वेमुळे देशभरातील प्रवाशांचा भुसावळ शहरासोबत (bhusawal city) थेट संपर्क येतो. त्यामुळे शहरात कोरोनाच्या (corona) रुग्णसंख्येने मुसंडी मारली आहे. तिसर्या लाटेतील पहिल्या रुग्णाला रेल्वेची ट्रॅव्हल हिस्ट्री होती. सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 50 ते 52 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. त्यापैकी काही रुग्ण रेल्वे संबधीत विभागातील बाधितांच्या संपर्कात आले आहेत. शहरातील दाट लोकवस्ती, नियमांकडे दुर्लक्ष यामुळेही रुग्णसंख्या वाढत आहे.






