भुसावळ शहर व बाजारपेठ ठाण्याच्या निरीक्षकांसह जिल्ह्यातील सहा निरीक्षकांच्या बदल्या
भुसावळ शहर निरीक्षकपदी गजानन पडघण तर बाजारपेठचे नूतन निरीक्षक राहुल गायकवाड ः जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने पोलिस वर्तुळात उडाली मोठी खळबळ
भुसावळ : जळगाव जिल्हा पोलिस दलातील (Jalgaon Police Dal) सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवार, 20 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (sp pravin mundhe) यांनी काढले असून त्यात भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यातील निरीक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भुसावळातील दोन्ही अधिकार्यांची कामगिरी समाधानकारक असतानाही त्यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही अधिकार्यांच्या बदल्या रीक्त पदांवर करण्यात आल्या आहेत.
भुसावळात एकाचवेळी दोन प्रभारी अधिकार्यांच्या बदल्या
भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी गजानन पडघण (bhusawal city pi gajanan padghan) तर बाजारपेठचे नूतन निरीक्षक राहुल गायकवाड (bajarpet pi rahul gayakwad) बदलून येत आहेत तर शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे यांना पहुर पोलिस ठाण्यात तर बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत (pi dilip bhagwat) यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक देण्यात आली आहे.


या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
पहुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे (pi arun dhanwade) यांची कसुरीवरून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे (pi pratap engale) यांची पहुर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे गजानन लक्ष्मण पडघण (pi gajanan padghan) यांची भुसावळ शहर पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली.
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पांडुरंग भागवत (pi dilip bhagwat) यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.
बोदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षकपदी राहुल गायकवाड (pi rahul gayakwad) यांची भुसावळ बाजारपेठच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली.
जळगाव नियंत्रण कक्षाचे राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ (pi rajendra gunjal) यांची बोदवड निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.





