राज्यात शाळा सुरू होणार : आदित्य ठाकरे यांची माहिती
मुंंबई : कोरोनामुळे राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला मात्र आता शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Mantri Aaditya Thackeray) यांनीही शाळा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे दिल्याचे सांगितले जात आहे.
ट्विट करीत दिली माहिती
आदित्य ठाकरे (Mantri Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची बैठक बुधवारी झाली. यात कोरोना परीस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेंच शाळा सुरू करण्याबाबतच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे तसेच बैठकीत 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतचा आढावा घेण्यात आला.







