बोदवड नगरपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा : जाणून घ्या प्रभागनिहाय विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली

माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांना होम पीचवर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा ‘दे धक्का’ : शिवसेनेला 9 तर राष्ट्रवादीला 7 जागांवर यश : ईश्वर चिठ्ठीने भाजपाला एका जागेवर यश : अपक्षांसह काँग्रेसचा धुव्वाँ


भुसावळ/बोदवड : शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीतही माजी मंत्री खडसे यांना बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत धक्का देत शिवसेनेची एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादीला अवघ्या सात जागा मिळाल्या तर शिवसेनेने नऊ जागा पटकावत नगरपंचायत ताब्यात खेचली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनादेखील बोदवडकरांनी सपशेल नाकारले तर ईश्वरचिठ्ठीतून एका उमेदवाराला लॉटरी लागल्याने भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, वंचित आघाडी तसेच अपक्षांचा या निवडणुकीत पुरता धुवाँ उडून उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली.

गुलालाची उधळण अन जल्लोष
जामनेर रोडवरील तहसील कार्यालयात बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. जस-जसा निकाल जाहीर होत होता तस-तसा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत असल्याचे दिसून आले. साधारण तीन तासात मतमोजणी आटोपली. निकालानंतर विजयी उमेदवार गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तसेच फटाक्यांची आतषबाजीदेखील केली आहे. बोदवडमधील सेनेच्या विजयानंतर मुक्ताईनगरातही जल्लोष करण्यात आला.



बोदवडमधील प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे

प्रभाग क्रमांक एक : शिवसेना उमेदवार विजयी
रेखा संजू गायकवाड (466, शिवसेना), वैशाली योगेश कुलकर्णी (73, भाजपा), कुसूम अशोक तायडे (14, काँग्रेस), प्रमिला संजय वराडे (राष्ट्रवादी, 279)

प्रभाग क्रमांक दोन : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
कडूसिंग पांडुरंग पाटील (367, राष्ट्रवादी), सचिन सुभाष देवकर (233, शिवसेना), महेंद्र प्रभाकर पाटील (75, भाजपा), अंकेश राजेंद्र अग्रवाल (11, काँग्रेस), रेखा निवृत्ती ढोले (11, संभाजी ब्रिगेड)

प्रभाग क्रमांक तीन : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
योगीता गोपाळ खेवलकर (405, राष्ट्रवादी), सुजाता देवेंद्र खेवलकर (383, शिवसेना), कविता पवन जैन (164, भाजपा), शुभांगी प्रवीण मोरे (5, वंचित आघाडी)

प्रभाग क्रमांक चार : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
सईदाबी सैय्यद रशीद बागवान (551, राष्ट्रवादी), सकीना बी.शेख कलीम कुरेशी (211, शिवसेना), जकीया बी.मुसा मुसलमान (106, भाजपा)

प्रभाग पाच : ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवार विजयी
विजय शिवराम बडगुजर (374, भाजपा), गोपाळ बाबूराव गंगतीरे (374, राष्ट्रवादी), दिनेश गजानन लभाने (61, अपक्ष), देवेंद्र समाधान खेवलकर (6, शिवसेना). दरम्यान, या प्रभागात राष्ट्रवादी व भाजपा उमेदवाराला समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपा उमेदवार विजय बडगुजर विजयी झाले.

प्रभाग सहा : शिवसेना उमेदवार विजयी
पूजा प्रितेश जैन (302, शिवसेना), सरीता संदीप जैन (296, राष्ट्रवादी), शीतल अमोल देशमुख (176, भाजपा), पूजा गोपाळ व्यास (67, अपक्ष), विद्या संजय अग्रवाल (28, अपक्ष)

प्रभाग सात : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
पूजा संदीप पारधी (244, राष्ट्रवादी), संजीव छगन गायकवाड (188, शिवसेना), आकाश श्रीराम पारधी (18, काँग्रेस), मधुकर रामसिंग पारधी (133, भाजपा)

प्रभाग आठ : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
एकता बी.लतीफोद्दीन शेख (431, राष्ट्रवादी), संदीप मधुकर गंगतीरे (314, शिवसेना), संजय श्रावण बोदडे (32, अपक्ष), दिलीप त्र्यंबक घुले (20, भाजपा), पवन मधुकर बांगर (21, अपक्ष), सनी आनंदा सारवान (20, अपक्ष)

प्रभाग नऊ : शिवसेना उमेदवार विजयी
आनंदा रामदास पाटील (506, शिवसेना), मण्यार शेख सुलमान शेख रफीक (118, काँग्रेस), नितीन चावदास वंजारी (155, राष्ट्रवादी)

प्रभाग दहा : शिवसेना उमेदवार विजयी
मनीषा कैलास बडगुजर (380, शिवसेना), रेखा कैलास चौधरी (355, राष्ट्रवादी), संजीवनी विनोद कुंभार (23, काँग्रेस), चंद्रकला प्रदीप त्रांगडे (53, भाजपा)

प्रभाग 11 : शिवसेना उमेदवार विजयी
बेबीबाई रमेश चव्हाण (439, शिवसेना), दिशा नरेशकुमार आहुजा (311, भाजपा), रेखा कडू माळी (88, राष्ट्रवादी), संगीता सुधीर पाटील (89, काँग्रेस)

प्रभाग 12 : शिवसेना उमेदवार विजयी
शारदा सुनील बोरसे (557, शिवसेना), शमीमनाबानो असलम शेख कुरेशी (376, अपक्ष), शाहीन बी रहिम खान पठाण (5, काँग्रेस), उषा रवींद्र माळी (22, राष्ट्रवादी)

प्रभाग 13 : शिवसेना उमेदवार विजयी
सईद इब्राहीम बागवान (567, शिवसेना), राहुल रामचंद्र माळी (273, भाजपा), वाहेद अली समदअली (225, राष्ट्रवादी)

प्रभाग 14 : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
शेख जफर अल्ताफ (402, राष्ट्रवादी), शेख इरफान शेख चाँद (192, काँग्रेस), शेख अजमोद्दीन शरीफोद्दीन (101, भाजपा), शेख इसराईल शेख असलम (155, शिवसेना)

प्रभाग 15 : राष्ट्रवादी उमेदवार विजयी
शाह मुजम्मील शाह मुजफ्फर शाह (662, राष्ट्रवादी), शेख तौफिक शेख अय्युब पिंजारी (271, शिवसेना)

प्रभाग 16 : शिवसेना उमेदवार विजयी
बेबीबाई विनोद माळी (473, शिवसेना), राजेश्री आनंद माळी (247, राष्ट्रवादी), सलीमा बी.दिलदार पिंजारी (149, काँग्रेस)

प्रभाग 17 : शिवसेना उमेदवार विजयी
मीरा दिनेश माळी (816, शिवसेना), मोहिनी शुभम माळी (235, राष्ट्रवादी), रशीदा बी. अलीम शाह फकीर (31, अपक्ष), स्मिताबाई सुभाष माळी (5, काँग्रेस)





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !