दारूण पराभव भाजपाच्या गिरीश महाजनांचा चर्चा मात्र माजी मंत्री खडसेंच्या पराभवाची !


भुसावळ : राज्याचे लक्ष लागलेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील (mla chandrakant paitl) यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करीत माजी मंत्री खडसेंच्या होमपीचवर त्यांनाच धक्का देत निर्विवाद वर्चस्व मिळवून नगरपंचायतीवर भगवा फडकवला. वास्तविक पहायला गेले तर या निवडणुकीत माजी मंत्री खडसेंना (eknathrav khadse) धक्का तर बसलाच मात्र दारुण पराभव खरा भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजनासह (bjp leader girish mahajan) खासदार रक्षा खडसे यांचाही झाला. या नेत्यांच्या सभा होवूनही भाजपाला मतदारांनी सपशेल नाकारले तर ईश्वर चिठ्ठीने व नशिबाने एकतरी जागा भाजपाच्या पदरात पडली मात्र संपूर्ण निवडणुकीत चर्चा मात्र खडसेंच्या झालेल्या पराभवाची राहिली.

आधी विधानसभा आता नगरपंचायत निवडणूक
यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री खडसे यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे (add.rohini khadse) यांचा मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता त्यानंतर बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अ‍ॅड.रवींद्र भैय्या व अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतरही वाद पेटला व मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांवरून राजकारणही पेटलेले दिसून आले. त्यातच अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला व हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याने त्याबाबत त्यांनी तक्रारही दाखल केली व यानंतर आमदार पाटील (mla chandrakant patil) व माजी मंत्री खडसे (eknathrav khadse) यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या. या सर्व प्रकारानंतर नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची झाली व दोन्ही नेत्यांनी ताकदही त्यात लावली मात्र खडसेंना पुन्हा धक्का देण्यात आमदार चंद्रकांत पाटील यशस्वी ठरले.


भाजपाला आत्मचिंतनाची गर
वास्तविक भाजपाला सपशेल बोदवडकरांनी नाकारले हे वास्तव स्वीकारण्यासह आत्मचिंतनाची गरज भाजपाला आहे मात्र या निवडणुकीत खरी चर्चा रंगतेय ती खडसेंना मिळालेल्या धक्क्याची ! भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाचा पराभव का झाला याची चर्चा होण्याऐवजी खडसेंची कशी निवडणुकीत जिरली? यावरही मंथन सुरू असल्याचे दिसून येते. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (bjp leader girish mahajan), खासदार रक्षा खडसे (mp raksha khadse) यांनी या निवडणुकीत पराभव का झाला याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !