हजयात्रा 2022 साठी 62 हजार भाविकांचे अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्याची 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत


यावल : हजयात्रा2022 साठी गेल्या काही दिवसात अर्ज दाखल करणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ झालेली असून गेल्या शनिवार, 8 जानेवारीपर्यंत 53 हजारावर भाविकांचे अर्ज दाखल झाले तर 20 जानेवारीपर्यंत ही संख्या 62 हजार झाल्याची माहिती हज कमिटीच्या सूत्रांनी दिली. सोमवार, 31 जानेवारी 2022 अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

31 जानेवारी अखेरची मुदत
हज कमेटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकुब शेख म्हणाले की, भारत आणि सौदी अरब दरम्यान हजयात्रेविषयी आपसात करार झाल्यावर भाविकांच्या अर्ज दाखल करण्याच्या संख्येत वाढ होणार आहे. गत 8 जानेवारी रोजी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हज ट्रेनिंग उद्घाटन प्रसंगी 53 हजारावर भाविकांचे अर्ज दाखल झाल्याचे जाहीर केले होते. हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकुब शेख यांनी सांगितले की, रविवार, 31 जानेवारी 2022 अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे तसेच शेवटच्या तारखेच्या मुदतीपर्यंत अर्ज दाखल करणार्‍या भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. यंदाची हजयात्रा पूर्णपणे डिजिटल झाली आहे. भाविक हजयात्रा नोंदणी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करत असून मोबाईलचा सुद्धा अर्ज भरण्यासाठी उपयोग करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !