संतापजनक : नौदलासह लष्कराच्या तीन जवानांचा विवाहितेवर बलात्कार


नवी दिल्ली : नौदल आणि लष्कराच्या तीन जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडीतेन दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस पसार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 जणांनी महिलेवर दोन वेळा सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा अश्लील व्हिडिओही बनवला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

अत्याचार करीत बनवला व्हिडिओ
अत्याचाराच्या घटनेनंतर पीडिता दिल्ली सोडून तिच्या गावी गेली. पतीने समजावल्यानंतर महिलेनं पुन्हा दिल्लीला येऊन आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडीता घराजवळील एका पार्कमध्ये फिरत असताना तिच्या शेजारी राहणारा एक आरोपी तेथे पोहोचला आणि कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्याने घरी येण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतरही आरोपीनं तिला जबरदस्ती केली आणि घरी घेऊन गेला. आरोपीचा एक मित्र तिथे आधीच हजर होता. दोघांनी महिलेवर बलात्कार केला आणि यादरम्यान व्हिडिओही बनवला. महिलेला दोघांनीही धमकी दिली की, याबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. यानंतर महिला तिच्या घरी गेली आणि बाहेर जाणे बंद केले. दोन महिन्यांनंतर पीडिता काही कामानिमित्त घराबाहेर पडली असता, आरोपीने तिला पुन्हा एकदा पकडून मुनिरका येथे नेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. येथे त्याने आधी एका घरात नेऊन स्वत: बलात्कार केला आणि त्यानंतर मित्रालाही बोलावलं मित्रानं सुद्धा पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला पतीसह गावी परतली आणि दिल्लीला येण्यास नकार दिला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !