नात्याला काळीमा : मानलेल्या भावानेच मित्रांसोबत बहिणीवर केला अत्याचार


सुरत : मानलेल्या भावानेच आपल्या बहिणीवर मित्रांसोबत गँगरेप केल्याची संतापजनक घटना सुरतमध्ये उघडकीस आली. आरोपीने जबरदस्ती मुलीच्या भांगेत कुंकू भरलं आणि नंतर आपल्या मित्रांसोबत मिळून गँगरेप केला. पीडितेने सूरतच्या डिंडोली पोलीस स्टेशनमध्ये तिन्ही आरोपींविरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल केला.

पीडीतेचा आरेापीसोबत लग्नाला नकार
पीडितेचे आई-वडील आरोपीसोबतच तिचं लग्न लावून देणार होते. पण ती यासाठी तयार नव्हती आणि तिने पोलिसात तक्रार दिली. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिला शिकून काहीतरी बनायचं होतं. लग्न टाळण्यासाठी ती तिच्या नातेवाईकाच्या ओळखीच्या एका तरूणासोबत दीड वर्षाआधी सूरतला पळून आली होती. तेव्हापासून ती तरूणाला आपला मानलेला भाऊ म्हणत होती. मग अचानक या मानलेल्या भावाने अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपली पत्नी बनवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवू लागला.





पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप
पीडितेचा आरोप आहे की, तरूणाने तिला त्याच्या मित्रांकडे सोपवलं आणि एका रिकाम्या घरात तिच्यासोबत गँगरेप करण्यात आला. पीडितेचा असाही आरोप आहे की, तिने आधीही पोलिसात तक्रार दिली होती. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. डिंडोली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !