आदिवासी दिनानिमित्त फैजपूरमधील रॅलीने वेधले लक्ष
फैजपूर- जागतिक आदिवासी दिनानिमित्त फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. तडवी वाडा येथून न्हावी दरवाजा मार्गे खुशालभाऊ रोड अशी काढण्यात रॅली काढण्यात आली. सुभाष चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या हस्ते माल्यार्पण अर्पण करण्यात आली. त्यानंतर रॅली फैजपूर पालिकेत आली. पालिका सभागृहात आदिवासी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला उपनगराध्यक्ष रशीद तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान , नगरसेवक प्रभाकर सपकाळे, फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून रशीद तडवी हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी कृती समितीचे युनूस तडवी यांनी सूत्रसंचालन केले.
रॅलीत यांचा सहभाग
रॅलीसह कार्यक्रमास फैजपूर येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी व फैजपुरीयन ग्रुप, आदिवासी तडवी भिल्ल कृती समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीला माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, सुनील वाढे, भुसावळचे सचिन संतोष चौधरी, धीरज अनिल चौधरी, इंजिनिअर संजय वाणी यांनी भेट दिली.