प्रेम विवाहानंतर चक्क पत्नीलाच विकले : या राज्यातील धक्कादायक घटना
नवी दिल्ली : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढवून नंतर तरुणीशी लग्न केले व नऊ महिन्यानंतर पत्नीचाच सौदा करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये उघड झाली. पीडित मुलीने आरोपी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.
आधी ओढले प्रेमाच्या जाळ्यात
श्योपूरच्या डोंगरपूर गावात राहणारा सतीश जाटव याच्या भावाचं सासर शिवपुरी जिल्ह्यातील झरी गावात असल्याने तो भावाच्या सासरी जात होता. यातच त्याचे वहिनीच्या बहिणीशी सूत जुळले. मुलगी आणि तिचा आरोपी पती जवळपास 9 महिने एकत्र राहत होते. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचेही मंदिरात लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवस दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले, मात्र काही काळानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. सतीशने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने पत्नीवर सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पत्नी सहमत न झाल्याने सतीशने तिला दोन महिन्यांपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे राहणार्या सोनरामला विकले.




पत्नीचा सौदा झाला, पीडितेला दोन महिने कैद
सौदा झाल्यानंतर सोनरामने मुलीला जयपूरमध्ये ओलीस ठेवले. दोन महिने त्याने तिच्यावर अत्याचार केला. अखेर एक दिवस संधी मिळताच मुलगी जयपूरमधून पळून गेली. मंगळवारी मुलगी शिवपुरी येथे आली. त्यानंतर पीडितेने तिची संपूर्ण कहाणी गावातील कुटुंबीयांना सांगितली. यानंतर दुपारी तरुणीने शिवपुरी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. यामध्ये मुलीने पती सतीश, सासरा रतिराम, मामे सासरे नरेश आणि जयपूरचे रहिवासी सोनराम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.