‘त्या’ स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील : देवेंद्र फडणवीस
मुंबई : लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कल्पनाच करवत नाही
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे, अशा भावना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.




By the demise of BharatRatna Lata Didi Mangeshkar, India not only has lost a voice, but the soul of Indian Music.
God took back its beautiful gift to all of us.
We lost Goddess of Indian Music.
Hard to believe she’s not with us.
We have lost an integral part of our life. pic.twitter.com/DOeZMdx9b1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022