मोलगी पोलिस ठाण्यातील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात


अवैध वाहतुकीचे वाहन चालू देण्यासाठी स्वीकारली एक हजारांची लाच

नंदुरबार : अवैध वाहतुकीचे वाहन चालू देण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारणार्‍या मोलगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी ज्योतिबा कैलास दीपक (37, रा.धुळे) यास गुरुवारी सायंकाळी नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मोलगी येथील 41 वर्षीय तक्रारदाराचे महिंद्रा मॅक्स वाहन असून या वाहनातून मोलगी परीसरात वाहतूक करू देण्यासाठी 24 रोजी आरोपी ज्योतीबा दीपकने एक हजार 200 रुपयांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराने एक हजार रुपये देण्याचे ठरवत नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वी करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !