नाहाटा महाविद्यालयात नियोजन अभ्यास मंडळाचे उद्घाटन


भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात नियोजन अभ्यास मंडळाचे शुक्रवारी सकाळी सेंट आरसेटी, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था जळगावचे संचालक एस.एस.ईखारे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षणाच्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना बँकाकडून कोणकोणत्या योजनांद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते? त्यासाठी लागणारी प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती ईखारी यांनी मार्गदर्शनात दिली.

व्यासपीठावर या मान्यवरांची उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी व्ही.वायकोळे यांच्यासह प्रमुख अतिथी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर, दिनेश गवळे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ. एन.ई.भंगाळे, नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.एस.टी धुम उपस्थित होते.

एमसीईडी सदैव तत्पर -आनंद विद्यागर
महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागासोबत एमओयु केलेले असल्या कारणाने विद्यार्थी पाहीजे ती माहिती आमच्याकडून घेवू शकतात.एमसीईडी आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. आपण या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद विद्यागर यांनी केले. एमसीईडी अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबविल्या जाणार्‍या प्रशिक्षण संदर्भात माहिती दिली.

उद्योगाकडे वळा -प्राचार्य
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे व एमसीईडी आणि बँकांच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा.एस.टी.धुम यांनी तर सूत्रसंचलन प्रा.व्ही.ए.सोळुंके यांनी तसेच आभार प्रा.डॉ.के.ए.वारके यांनी मानले.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.आर.एस.गोरले, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, प्रा.जे.पी.आडोकार, प्रा.उज्वला महाजन, एम.ए.अर्थशास्त्रचे विद्यार्थी सुरज धांडे, किरण बुगले, रेखा कापुरे यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, शनिवा, 10 ऑगस्ट रोजी विभागांतर्गत दत्तक खेडेगांव महादेवमाळ येथे वृक्षारोपण केले जाणार असल्याचे प्रा.प्रशांत पाटील कळवतात.


कॉपी करू नका.