भुसावळातील माजी नगरसेवक दिनेश उर्फ लड्डू जोगदंड यांचे निधन : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील रेल्वे दवाखान्यामागील डॉ.आंबेडकर नगरातील रहिवासी व माजी नगरसेवक दिनेश उर्फ लड्डू जगन्नाथ जोगदंड (54) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी चार वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी असा परीवार आहे.

माजी नगरसेवकांच्या निधनाने सर्वत्र हळहळ
अत्यंत मितभाषी व सर्वांच्या सुख-दुखाःत सहभागी होणार्‍या दिनेश जोगदंड यांच्या अकाली निधनाने शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.


कॉपी करू नका.