Shane Warne धक्कादायक : दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराने निधन


Shane Warne न्यूज डेस्क : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने क्रिकेट चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तेथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. पण मग या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.

महान फिरकी गोलंदाज हरपला
दरम्यान, वॉर्नच्या (Shane Warne)  व्यवस्थापनाने निधनाबाबत शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडल्याने वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्ननेही (Shane Warne)  अलीकडेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे वर्णन केले होते. वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले आणि रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.





700 पेक्षा अधिक विकेट घेतल्या
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. वॉर्न हा जगातील महान स्पिनर मानला जात होता. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने 2007 मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न (Shane Warne)  हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत 708 तर वनडेत 293 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !