मोठी बातमी : ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी


OBC Reservation मुंबई : ओबीसी आरक्षण विधेयकावर (OBC Reservation) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी स्वाक्षरी केल्याने आगामी काळात लवकरच पालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसींनाही राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने विधानसभेत एक विधेयक आणले होते. त्यात प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचं हे विधेयक होते. हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आल्याने आता राज्यात ओबीसींना राजकीय लाभ मिळणार असून त्यानंतरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील, असा अंदाज आहे.

सहा महिन्यात होणार निवडणुका
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व इतर मागास वर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे विधेयक घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनात घेतली. राज्य सरकारने दिलेल्या विधेयकावर आता राज्यपालांनी सही केल्यानंतर महापालिकेसह जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत.





ओबीसींना मोठा दिलासा : डेटाकडे लागले लक्ष
जोपर्यंत मागासवर्ग आयोगाचे ओबीसींसाठीचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्याचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत या निवडणुका होणार नाहीत त्यामुळे ओबीसींना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र सहा महिन्यांच्या आत या निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने आयोगाला युद्धपातळीवर डेटा गोळा करण्याचं काम करावं लागणार आहे म्हणून आयोग किती महिन्यात हा डेटा गोळा करणार याकडे राजकीय धुरीणांचे आता लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !