संतापजनक : भाडेकरू तरुणाच्या अत्याचारातून विधवा महिला गर्भवती : या राज्यातील घटना
नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. नराधम घर मालकाच्या अत्याचारातून (Rape) विधवा महिला सहा महिन्याची गरोदर राहिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. भटिंडा येथे ही घटना उघडकीस आली.
-
शेतातील विहिरीत पडल्याने जामनेर तालुक्यातील दोघा शेतमजुरांचा मृत्यू
-
अमळनेरात बंद घर चोरट्यांना पर्वणी : 84 हजारांचा मुद्देमाल लंपास
सहा महिन्यांपासून अनेकवेळा अत्याचार
विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी एका 22 वर्षीय विधवेने पोलिसांत तक्रार देऊन दीड वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. ती आपल्या मुलांसोबत राहते आणि कष्ट करते. घराचा खर्च भागवण्यासाठी तिने घरातील एक खोली फिरोजपूर येथील रवी कुमार याला भाड्याने दिली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी रवीने रात्री तिच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Rape) केला. त्यानंतर तिला धमकावून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती, म्हणून तो पसार झाला आहे.




-
जळगाव जिल्ह्यातील वयोवृद्धांना लुटणारा वराडसीमचा महाठग पोलिसांच्या जाळ्यात
-
ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी