रेल्वे प्रवाशांना इकडे लक्ष द्या ; रेल्वे प्रवासात आता मिळणार या सुविधा


नवी दिल्ली : कोरोना काळात रेल्वेने प्रवाशांना बेडशीट, चादर देणे बंद केले मात्र आता परीस्थिती नियंत्रणात असल्याने पूर्ववत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. होळीच्या आधी रेल्वेने प्रवाशांना हा दिलासा दिला असून रेल्वेत पुन्हा एकदा प्रवाशांना बेडशीट, चादर आणि पडदे देण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने काढले आदेश
सगळ्या विभागातील व्यवस्थापकांना याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या वस्तूंचा पुरवठा लगेच सुरू करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. याआधी खाद्यपदार्थासह अनेक सुविधा पुन्हा करण्याचे आदेश रेल्वेकडून देण्यात आले आहेत.





एसी कोचमध्ये सुविधांअभावी अडचणींचा सामना
गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी एसी कोचमध्ये चादर आणि बेडशीटची मागणी करत होते. या सुविधा मिळत नसल्यानं प्रवाशांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत होता. या सुविधा ट्रेनमध्ये मिळत नसल्यानं अनेक प्रवासी विमानानं प्रवास करत होते. रेल्वे आणि विमानाच्या तिकीट दरात फारसा फरक नाही. विमान प्रवासामुळे वेळही वाचतो.

कोरोनामुळे सुविधा होत्या बंद
कोरोना काळापूर्वी ट्रेनच्या एसी क्लासमध्ये प्रवाशांना एक बेड रोल मोफत मिळायचा. गरीब रथ ट्रेनमध्ये यासाठी नाममात्र शुल्क द्यावं लागायचं. एका बेड रोलमध्ये दोन चादर, एक उशी, एक पांघरूण आणि एक लहान टॉवेल मिळायचं. कोरोना काळात रेल्वेनं ही सुविधा बंद केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !