विवाहितेचा निर्वस्त्र मृतदेह आढळला
नवी दिल्ली : विवाहितेचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला असून ही घटना अत्याचारानंतर खून करण्यात आल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील घटनेनंतर खळबळ उडाली आहे. आहे. येथे एक माणूस त्याच्या मुली आणि पत्नीसोबत राहतो. शेतकरी असल्याने हा व्यक्ती रात्री शेतात गेला होता,
खून आणि बलात्काराचा आरोप
मृत महिलेचा पती धीर सिंग याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या पीडित धीर सिंगने पत्नीचा खून आणि बलात्कार झाल्याची भीती व्यक्त केली असून या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणीही पोलिसांकडे केली आहे.




शवविच्छेदनानंतर कारण होणार स्पष्ट
हसनपूर सर्कलचे डेप्युटी एसपी सतीश चंद्र पांडे म्हणाले, आदमपूर पोलिस स्टेशनच्या गावात एका महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
विवस्त्र अवस्थेत पत्नीचा मृतदेह आढळला
मृतकाच्या पतीने सांगितले की, मी बहुतांशी शेतावरच राहतो, सकाळी 7 वाजता मी शेतातून घरी आलो, तेव्हा आतून कडी लावली होती, मग मी छतावरील जाळीतून डोकावले तर माझी पत्नी विवस्त्र अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्यालाही मार लागला होता, कोणीतरी खूप मारल्याचं दिसत होतं, मी लगेच पोलिसांना कळवलं आणि तासाभरानंतर पोलीस इथे आले.