जैन तेरापंथ धर्मसंघाच्या साध्वी समुदायप्रमुख कनकप्रभा यांचे महाप्रयाण


Sadhvi Kanakaprabha  भुसावळ : जैन तेरापंथ धर्मसंघाच्या साध्वी समुदायाच्या मुख्य शासन माता साध्वी प्रमुखा कनकप्रभाजी (Sadhvi Kanakaprabha) यांचे दिल्ली येथे गुरुवार, 17 मार्च रो जी सकाळी 8.45 वाजता महाप्रयाण झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृत अस्वास्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

अखेरच्या क्षणी आचार्य महाश्रमणांची सोबत
जैन समाजाचे आचार्य महाश्रमण साध्वी यांनी नेहमीच साध्वी कनकप्रभा (Sadhvi Kanakaprabha) यांचा आदर केला व त्यांच्या आजारपणाबाबतची माहिती त्यांना कळाल्यानंतर पाच दिवसात 177 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी दिल्ली गाठली. साध्वी कनकप्रभा यांची खालावलेली प्रकृती पाहून गुरुवारी सकाळी त्यांनी संथाराचा त्याग करून दिला व दिड तासानंतर त्यांचे महाप्रयाण झाले.





19 व्या वर्षी घेतली दीक्षा
साध्वी प्रमुख कनकप्रभा (Sadhvi Kanakaprabha)
यांचा जन्म 22 जुलाई 1941 रोजी कलकत्ता येथे झाला व वयाच्या 15 व्या वर्षी पारमार्थिक शिक्षण संस्थेत (लाडनू) येथे प्रवेश घेवून 19 व्या वर्षी आचार्य तुलसी यांच्या करकमलांद्वारे 8 जुलाई 1960 मध्ये दीक्षा घेतली.

विविध उपाधींनी गौरव
वयाच्या 30 व्या वर्षी आचार्य तुलसी यांनी गंगाशहर येथे 17 जानेवारी 1972 रोजी पाचशे साध्वींच्या उपस्थितीत साध्वीप्रमुख हे पद देण्यात आले तर 1980 मध्ये त्यांना महाश्रमणी हे पद देण्यात आले. 1991 मध्ये त्यांना आचार्य तुलसी यांनी ‘संघ महानिर्देशिका’ हे पद दिले. त्यानंतर आचार्य महाप्रज्ञ यांनी 2006 मध्ये असाधारण हे पद दिले. साध्वीप्रमुखा (Sadhvi Kanakaprabha) या पदाच्या अमृत महोत्सव वर्षात 30 जानेवारी 2022 रोजी आचार्य महाश्रमण यांनी त्यांना ‘शासन माता’ हे संबोधन देवून त्यांचा गौरव केला. गेल्या सहा दशकांपासून त्या संघाची सेवा बजावत होत्या शिवाय उत्तम वक्ता, लेखिका, संपादक, कवयित्री अशा बहुआयामी व्यक्तिमत्व त्या होत्या. त्यांना हिंदी, प्राकृत, संस्कृत, मारवाडी, गुजराथी आदी भाषा अवगत होत्या. आचार्य तुलसीद्वारा लिखीत 50 हून अधिक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांनी लिहिलेला यात्राग्रंथ हा हिंदी साहित्यातील एक महान कृती म्हणून ओळखली जाते. साध्वी समाज व समणी समाजाच्या उत्थानावर त्यांनी नेहमीच भर दिला. कनकप्रभाजी (Sadhvi Kanakaprabha) यांनी तेरापंथ धर्मसंघाच्या तीन आचार्यांचा शासन काळ पाहिला व आपली सेवा अर्पित केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !