पतीसह मुलांच्या डोळ्यादेखत विवाहितेवर सामूहिक बलात्कार


Dholpur Gangrape नवी दिल्ली : विवाहितेेवर तिच्याच पती आणि मुलांसमोर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सहा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बंदुकीच्या धाकावर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत शेतातून परतत असताना ही घटना घडली. सहा जणांनी त्यांना अडवलं आणि बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं. आरोपींनी महिलेच्या पतीला मारहाण केली आणि यानंतर सहा पैकी दोघांनी मुलांसमोरच महिलेवर बलात्कार  (Gangrape) केला. यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. महिलेची मुले आपल्या आईची नराधमांच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून रडत होती., ओरडत होती पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.





राष्ट्रीय आयोगाकडून घटनेची दखल
महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, आपल्या पतीलाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार  (Gangrape), शारीरीक छळ तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय कुमार सिंह यांनी दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पसार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !