33 लाखांच्या थकबाकीमुळे मुक्ताईनगरात बीएसएनल टॉवरला सील


मुक्ताईनगर : मार्च एण्ड जवळ येताच विविध विभागांनी वसुलीला वेग दिला आहे. मुक्ताईनगर तहसील प्रशासनानेदेखील थकीत जमीन महसूल कराच्या वसुलीसाठी धडक मोहिम सुरू केली असून सुमारे 33 लाखांची थकबाकी न भरल्याने बीएसएनएल टॉवरला सील ठोकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बीएसएनएल टॉवर सील झाल्याने सेवा प्रभावीत झाल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप होत असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.

33 लाख 16 हजारांची थकबाकी
मुक्ताईनगरातील बीएसएनएल कंपनीकडे मोबाईल टॉवरच्या अकृषिक वापरापोटी 2010-2016 या वर्षातील 10 लाख 84 हजार 600 तर 2016-17 ते 2021-22 दरम्यानच्या काळातील एकूण 33 लाख 16 हजार 600 रुपयांची थकबाकी असल्याने तहसीलदार श्वेता संचेती यांनी थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावली होती व थकबाकी न भरल्यास टॉवरला सील लावण्याचा इशारा 15 मार्चच्या नोटीसीन्वये दिला मात्र दखल न घेण्यात आल्याने मंगळवारी टॉवरला सील लावण्यात आले.



यांनी केली कारवाई
ही कारवाई मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अनिकेत वाडे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, मंडळ अधिकारी किशोर तायडे, तलाठी महादेव दाणे, सोमनाथ बोरटकर यांनी बीएसएनएलचे मोबाईल टॉवर सील केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !