वखारीच्या गोदामाला आगीनंतर 11 कामगारांचा होरपळून मृत्यू
सिकंदराबाद : भोईगुडा भागातल्या वखारीच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
कामगारांचा होरपळून मृत्यू
सिकंदराबादच्या येथे लाकडाच्या वखारीला लागलेल्या आगीत 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती गांधीनगरचे स्टेशन ऑफिस अधिकारी मोहन राव यांनी दिली आहे. या दुर्घटनेतून 12 पैकी केवळ एकच व्यक्ती बचावला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.


मयत कामगार बिहारातील रहिवासी
वखारीला लागलेल्या आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले. वखारीत लाकडाचा भुसा देखील होते. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी वखारीतील कामगार झोपेत होते. 4 ते 5 कामगार वखारीतून कसेबसे बाहेर पडले. पण 11 जण आत अडकून पडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेतील मृत कामगार बिहारमधील आहेत. यात होरपळलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


