Russia Ukraine War माजी खासदारांच्या पत्नीला कोट्यवधींचे डॉलर्स घेवून पळताना सैनिकांनी पकडले


Russia Ukraine Warयुक्रेन : युक्रेनच्या हंगेरीच्या सीमेवर युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नीला सुटकेसमध्ये कोट्यवधी रुपये अवैध पद्धतीने नेताना सैनिकांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे. युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नीचं नाव कोटवित्स्की आहे. कोटवित्स्की पैसे घेऊन देश सोडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हंगेरीच्या सीमेवरील सुरक्षा जवानांनी तिला अडवले. सैनिकांनी संशयावरून तिच्या सुटकेसची झडती घेतली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सूटकेसमध्ये सुमारे 28 दशलक्ष डॉलर्स आणि 1.3 दशलक्ष युरो रोख होते. ती झाकरपट्टिया प्रांतातून हंगेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वखारीच्या गोदामाला आगीनंतर 11 कामगारांचा होरपळून मृत्यू 

तीन लाख लोकांचे पलायन
एकीकडे कोटवित्स्की कोट्यवधी रुपये घेऊन देश सोडून पळून जात असताना पकडले गेली. दुसरीकडे लाखो लोकांना त्यांचं सर्वस्व सोडून स्थलांतरील व्हावं लागत आहे. सुमारे तीन लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. नागरिक जीव वाचवण्यासाठी सर्वकाही सोडून जायला तयार झाले आहेत.



रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरुच
रशियन सैन्याने गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये हल्ले तीव्र (Russia Ukraine War) केले आहेत. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ल्यांद्वारे सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. सर्वसामान्यांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये दहशतीचे वातावरण असून लोक जीव वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत.

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा : मुख्यमंत्र्यांची झोप उडणार ; सहा घोटाळे बाहेर काढणार !





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !