महिला डॉक्टरांवर गँगरेप : पाच नराधमांना अटक


पाटणा : बिहारमधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली असून स्थानिक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे सांगितले. महिला डॉक्टरसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने डॉक्टर तसेच सर्वसामान्य जनता हादरली आहे. स्मशानभूमीजवळ ऑटोचालकासह त्याच्या इतर साथीदारांनी ही घृणास्पद घटना घडवून आणली.

बलात्काराच्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन
मिळालेल्या माहितीनुसार, वेल्लोरमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असे म्हटले आहे. मीडिया आणि पोलिसांच्या वृत्तानुसार, बिहारमधील रहिवासी पीडित तरुणी घटनेच्या दिवशी तिच्या मित्रासोबत चित्रपट पाहून घरी परतत होती. मध्यरात्री चित्रपट संपल्यानंतर दोघेही थिएटरसमोर ऑटोची वाट पाहत उभे होते. तेवढ्यात एक ऑटोचालक आला. त्या ऑटोमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त 4 जण आधीच बसले होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिने ऑटो चालकाला हॉस्पिटलच्या दिशेने चालायला सांगितले होते, मात्र काही अंतर गेल्यावर ऑटोचालकाने रस्ता बदलला आणि ऑटोचा वेगही खूप वाढला होता.

निर्जनस्थळी अत्याचार
महिला डॉक्टराने ऑटो चालकाला मार्ग बदलण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री रस्ता बंद असतो त्यामुळे त्या मार्गाने जाता येत नाही. पीडित महिला डॉक्टरने सांगितले की, ड्रायव्हरने वाटेत एका स्मशानभूमीजवळ एका निर्जन ठिकाणी ऑटो थांबवली. यानंतर चार मुले आणि ऑटोचालकाने महिला डॉक्टरचा विनयभंग सुरू केला. तिने विरोध केला असता सर्वांनी मुलीला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण केली.

एटीएममधून 40 हजारांची रक्कम काढली
या भयंकर घटनेनंतर महिला डॉक्टर घाबरून बिहारमध्ये आली. मारहाण, विनयभंग करूनही हे प्रकरण थांबले नसल्याचे महिला डॉक्टरने सांगितले. हे कृत्य केल्यानंतर सर्वांनी आलटून-पालटून महिला डॉक्टरवर बलात्कार केला. यादरम्यान पीडितेने तेथून निघून जाण्याची विनंतीही केली, मात्र आरोपीने तिचे ऐकले नाही. या भयंकर घटनेनंतर महिला डॉक्टर घाबरून बिहारमध्ये आली आहे. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस कारवाईत गुंतले असून तपासानंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हेगारांनी दोघांचे मोबाईल, रोख रक्कम आणि दागिने हिसकावले. पुरुष मित्राला एटीएममध्ये नेऊन बळजबरीने 40 हजारांची रक्कमही काढण्यात आली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !