दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करीत हत्या : आरोपी काकाला अटक


नवी दिल्ली : दोन वर्षांच्या मुलीचा तिच्या 31 वर्षीय काकाने कारमध्ये बलात्कार करून तिची हत्या केली. अटीबेले येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. बंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

कारमध्ये चिमुरडीवर अत्याचार अन केली हत्या
रविवारी 20 मार्च रोजी तिचा काका चिकन खरेदी करण्यासाठी भाचीला त्याच्या घरातून घेऊन गेला होता. दरम्यान त्याने आपल्या कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा ही मुलगी रडायला लागली, तेव्हा त्याने तिला जोरात थापड मारली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. 31 वर्षीय आरोपीने गुन्हा केल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयात नेलं. रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरु केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !