विवाहिता पडली बहिणीच्या नवर्‍याच्या प्रेमात मात्र घडले असे काही….


नवी दिल्ली : प्रेमात आंधळ्या झालेल्या विवाहितेने प्रियकराला सोबत घेवून पतीचेच प्राण घातले. झाले असे की, एका विवाहितेचे आपल्याच बहिणीच्या नवर्‍यावर प्रेम जडले मात्र प्रेमात नवरा आडकाठी येत असल्याने त्याचेा खून करण्या आला. बिहारमधल्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली.

चौघांना पडल्या बेड्या
नवीननगर जिल्ह्याच्या चंद्रगढमधील ही घटना आहे. पोलिसांनुसार संध्या देवीने तिचा पती धनंजयची हत्या केली आहे. बहिणीच्या नवर्‍यासोबत प्रेमसंबंध असल्याने पतीला वाटेतून हटविण्यासाठी तिने तीन जणांच्या साथीने ही हत्या केली आहे. पती तिच्या प्रेमसंबंधांत आड येत होता. एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, 21 मार्चला गोपाल यादव यांनी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा धनंजय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. मारहाण झाल्याचे दिसत होते. यामुळे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला. यानंतर एकेक करून या गुन्ह्यातील कड्या उलगडत गेल्या.

बहिणीच्या नवर्‍यासोबतच जुळले प्रेमसंबंध
लल्लू यादव नाव असलेल्या जिजूसोबत संध्याचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना समजले. धनंजय यादवच्या हत्येमागे त्याच्याच पत्नीचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. यासाठी तिने जिजू आणि अन्य दोन व्यक्तींची मदत घेतली होती. पतीला हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आली. ही हॉकी स्टीक, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !