संतापजनक : 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत बहिणीच्या प्रियकराने केला बलात्कार
नवी दिल्ली : चुलत बहिणीच्या प्रियकराने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात ही घटना घडली. . पीडित तरुणी शुक्रवारी एका मत्स्यालयाजवळ स्थानिकांना आढळून आली. ती सापडली तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
कोलकाता येथे मुलीवर उपचार
ही मुलगी आता कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात तिच्या मृत्यूशी झुंज देत आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांना आढळले आणि तिच्या गुप्तांगामध्ये काठी घातली गेली होती.


आरोपीला पोलिसांकडून अटक
हावडा जिल्ह्यातील डोमजूर येथून एका 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्याच्या प्रेयसीला नवा मोबाइल फोन आणि पैसे देण्याचे वचन दिले होते जर तिने तिच्या बहिणीला त्याच्यासोबत रात्र घालवू दिली. चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता म्हणून त्याने तिला मासेमारी परीसराच्या बाजूला सोडले.


