भुसावळात युवकाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
भुसावळ : मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी शहरातील क्रीडा संकुल परीसरात आलेल्या युवकास चौघा तरुणांनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री 8.45 वाजता घडली. याप्रकरणी चार अनोळखी व्यक्ती विरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमसंबंध उघड करण्याची पुतणीला धमकी देत नराधम काकाने केला अत्याचार
मारहाण करणार्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू
इंद्रप्रस्थ अपार्टमेंट जवळील क्रीडा संकुलाजवळ रविवारी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास सप्तमेश खेडकर हा युवक त्यांच्या मैत्रीणीसोबत फिरायला आला असता चौघांनी तरुणास शिविगाळ केली व मारहाण केली. सहायक फौजदार इकबाल सय्यद या प्रकरणी पुढील तपास करीत आहे. दरम्यान, क्र्रीडा संकुलाच्या परीसरात पोलिसांची सायंकाळनंतर गस्त सुरू केली जाणार असून दादागिरी वा रोडरोमिओगिरी होत असल्यास पोलिसांना सूचित करावे, निश्चित कारवाई होईल, असे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.




