सरकारी अभियंत्याच्या घरात सापडली एक कोटी 36 लाखांची बेनामी रोकड व कोट्यवधींच्या मौल्यवान वस्तू


भुवनेश्वर : एका सरकारी अधिकार्‍याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तब्बल एक कोटी 36 लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रंदेखील अधिकार्‍यांनी जप्त केली. ती पाहून धाड टाकणार्‍या अधिकार्‍यांना धक्काच बसला. ओदिशातील दक्षता पथकानं भ्रष्टाचाराविरोधात ही कारवाई केली आहे.

दक्षता पथकाची मोठी कारवाई
मलकानगरीमध्ये वास्तव्यास असलेला सरकारी अभियंता आशीष कुमार दासला गेल्या आठवड्यात शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी दास डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकाला 10.23 लाख रुपये देण्यासाठी गेला होता. दासला ताब्यात घेतल्यानंतर दक्षता पथकानं त्याच्याकडे असलेल्या काळ्या पैशांचा शोध सुरू केला. चार दिवसांनंतर दासशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू सापडल्या.



इतिहासात प्रथमच मोठी रोकड जप्त
कारवाईत 1.36 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाचे संचालक वाय. के. जेठवा यांनी दिली. ओदिशा दक्षता विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय पथकातील अधिकार्‍यांना 1.2 किलो सोनं सापडलं. दास यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या नावे ऍक्सिस बँकेत 12 खाती उघडली होती. त्यामध्ये जवळपास 2.25 कोटी रुपये आहेत. ही सगळी खाती दास स्वत: पाहायचे. यासोबतच त्यांनी एफडी, बचत खातीही उघडली होती. त्यात चार कोटी रुपये आहेत.

पत्नीच्या नावे खरेदी केला प्लॅट
दासनं त्याच्या पत्नीच्या नावे कटकमधल्या शांतीवन सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला. त्याची किंमत 32.30 लाख रुपये आहे. पत्नीच्या नावे केओन्जर जिल्ह्यातल्या बारिपाल येथे भूखंडदेखील खरेदी केला होता. अन्य बँक खाती आणि दोन लॉकर्सच्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं. नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागांच्या विकासासाठी आलेल्या निधीवर दासनं डल्ला मारल्याची माहिती जेठवा यांनी दिली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !