संतापजनक ! : शेल्टर होममध्ये दोन मुलींवर बलात्कार

महिला संचालकासह चौघांवर गुन्हा


Dilli Rape नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील सब्जी मंडी भागातील शेल्टर होममध्ये दोन मुलींवर बलात्कार (rape) झाल्याने खळबळ उडाली आहे. शेल्टर होमच्या महिला कर्मचार्‍याने शेल्टर होमच्या अधिकार्‍यावर बलात्कार आणि इतरांवर विनयभंग आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. आरोपीने शेल्टर होममध्ये राहणार्‍या मतिमंद मुलीवरही बलात्कार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. याबाबत शेल्टर होमच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता, त्यांनी उलट त्याला धमकावले आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पोलिसांनी शेल्टर होमच्या महिला संचालकासह चार जणांविरुद्ध बलात्कार (rape), विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जीवे मारण्याची धमकी
26 वर्षीय पीडीता उत्तर दिल्ली परीसरात एकटीच राहते. तिला पालक नाहीत. शिक्षण घेतल्यानंतर पीडीतेने दुसीब येथील सब्जी मंडी परिसरात एका शेल्टर होममध्ये नोकरीला सुरुवात केली. नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान शेल्टर होमच्या अधिकार्‍याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण ती कशीबशी वाचली. यानंतर आरोपीने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पीडितेने एनजीओच्या महिला संचालकाला फोन करून सर्व काही सांगितल्यावर उलट तिने पीडितेलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पीडित मुलगी दुसर्‍या दिवशी संचालकांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा तिला गप्प बसण्यास सांगण्यात आले. सदर बाब आरोपी व त्याच्या साथीदाराला समजताच त्याने सपनाला जीवे मारण्याची धमकी दिली.



भुसावळातील सेल्समनची आमोदा शिवारातील शेत विहिरीत आत्महत्या 

दोघांवर अत्याचाराने उडाली खळबळ
पीडित तरुणी घाबरून गप्प बसली. पीडिता शेल्टर होममध्ये पोहोचली तेव्हा दुसर्‍या एका मतिमंद मुलीने तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली. पीडितेने शुक्रवारी सब्जी मंडी पोलिस ठाण्यात महिला संचालक, दोन अधिकारी आणि एका कर्मचार्‍याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पाचोर्‍यात नवविवाहितेने गुंगीचे औषध देत पतीसह सासु-सासर्‍यांना केली बेदम मारहाण 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !