राजस्थानातून तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी केली अटक
चित्तोडगड : राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील निंबाहेडा पोलिसांनी बुधवारी तीन दहशतवाद्यांना अटक करून त्यांच्याकडून 12 किलो आरडीएक्स जप्त केले.
साखळी बॉम्बस्फोट उधळला
सूत्रांनुसार, जयपूरमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. त्यांच्या कारमध्ये बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि टाइमरही मिळाले आहे. दहशतवादी मध्य प्रदेशातील रतलामहून जयपूर येथे जात होते. अफीम डोडाचूरा तस्करीसाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. पकडलेले तिघही सूफा संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.




